मुस्लिम समजालाही हवे शिक्षण व नोकरीत आरक्षण  

Nanded News
Nanded News
Updated on

नांदेड : मुस्लिम समाजालाही १० टक्के आरक्षण राज्य सरकारने लवकरात लवकर द्यावे अश्या मागणीचे निवेदन धर्माबाद मुस्लिम समाजाकडून धर्माबादचे तहसिलदार यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले की, शासनाने मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात अनेक आयोग नेमले होते. प्रत्येक आयोगाने वेळोवेळी मुस्लिम समाजातील आर्थिक, सामाजिक शैक्षणिक मागासलेपण शासनाच्या निर्दर्शनास आणून देणारा अहवाल सादर केला. त्यातून मुस्लिम समाजाची अवस्था अतिशय बिकट असून खालच्या पातळीला गेली आहे हे वेळोवेळी निष्पन्न झालेले आहे. तरीही शासन दरबारी आरक्षणाच्या दृष्टीने अनास्था दिसून येत आहे.

महाविकास आघाडी सरकारने देखील आपल्या संयुक्त जाहिरनाम्यामध्ये मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याचे जाहीर केलेले आहे. नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएसी) परीक्षेचा विचार करता यामध्ये मुस्लिम समाजाची टक्केवारी ही अतिशय कमी म्हणजे एक टक्केपेक्षा कमी असल्याचे निर्दर्शनास आलेले आहे. महाराष्ट्रात कॉंग्रेसच्या आघाडी सरकारने मुस्लिमांना पाच टक्के कोटा दिला; पण त्या विरुद्ध केस हायकोर्टात गेली. कोर्टाने मुस्लिमांचे शैक्षणिक अहवाल चालू ठेवायला सांगितले; पण मागील भाजप सरकारने मुस्लिम आरक्षणाचे नोटिफिकेशन संपल्यानंतर नवे नोटिफिकेशन काढलं नाही. त्यामुळे अजून ही मुस्लिमांना आरक्षण मिळू शकले नाही.

मुस्लिमांना आरक्षण मिळण्यासाठी तत्कालीन सरकारने काही पावले उचलेली नाहीत. रंगनाथ मिश्र कमिशन, न्यायमूर्ती राजेंद्र सच्चर समितीसह माहेमुदूर रहेमान समितीच्या अहवालातून मुस्लिम समाजाची शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक व शासकीय नोकरीत असलेली परस्थिती समोर आलेली आहे. मुस्लिम समजाला आरक्षण देण्याची शिफारस सर्व समितीने केली होती. मुस्लिमांची सामाजिक आणि राजकीय स्थिती दयनीय असल्याने त्यांना  आरक्षण मिळण्यात कोणतीच घटनात्मक किंवा कायदेशीर अडचण नसतानाही आरक्षण नाकारले जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात मुस्लिमांना शैक्षणिक, नोकरी आणि गृहनिर्माण, शासकीय तसेच खाजगी क्षेत्रात, कायमस्वरूपी आरक्षण मिळावे तसा तो मुस्लिमांचाही घटनात्मक व मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे राज्य सरकारने लावकारात लवकर मुस्लिम समजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी मुस्लिम आरक्षण समितीचे संयोजक महमद मुबशिर, समीर भाई, मसूद खान, शब्बीर भाई नावदिकर, श्री. लड्डा, श्री. रज्जाक, सय्यद बाबर, जलील भाई, सलीम भाई आदींनी निवेदनात केली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com